डीजेच्या तालावर नाचतांना लागला धक्का ! क्षुल्लक कारणावरुन दोघांवर कुर्हाडीने हल्ला

लग्न समारंभ म्हंटला कि वरात, डान्स, डीजे व वाद हि गोष्ट काही नवीन नाही . मात्र संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकाने दोघांवर कुर्हाडीने हल्ला करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात एका लग्नाची वरात सुरू होती.
या वरातीमध्ये नाचत असतांना धक्का लागल्याचे कारणावरून दिनेश डहाळे व इतरांमध्ये किरकोळ वाद झाला. वरातीत झालेल्या वादाबाबत समजावून सांगत असल्याचा दिनेश डहाळे यास राग आल्याने त्याने हातातील कुर्हाड दोघांच्या डोक्यात मारली.
या हल्ल्यातत चेतन राजेंद्र भडांंगे (वय 24) व नितीन रमेश वाघ (रा. गुंजाळवाडी) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. याबाबत कृष्णा राजेंद्र भडांगे याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दिनेश डहाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.