अहमदनगरताज्या बातम्यापाथर्डी

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावरील ताबा सुटला अन पुढे नको तेच घडले

Ahmednagar News : तालुक्‍यातील मानमोडी येथील धोकादायक वळणावर ईरटीका गाडीला अपघात होऊन सातजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

निर्मल- कल्याण (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाने नगरच्या दिशेने भरधाव जाणारी ईरटीका कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार मानमोडी येथील धोकादायक वळणावरील फुलाच्या खडुयात जाऊन पडली. रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली.

अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून, गंभीर जखमीत एक महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. सर्व जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र, याबाबतचा फलक येथे लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडतो.

Advertisement

त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काम चालू असलेल्या ठिकाणी सावधगिरीचे फलक लावणे आवश्यक असल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे. जखमींची नावे- अंकुश बाबुराव अडळकर (वय ४५), सीताबाई अंकुश अडळकर (वय ४२), गंगुबाई भुजंगराव देखमुख (वय ७५), गंगुबाई बाबुराव अडळकर,

(वय ७०), पल्लबी नवनाथ देशमुख (वय १४), रुपाली बालाजी देशमुख (वय २६) व रुपाली देशमुख यांची एक महिन्यांची मुलगी, या अपघातात जखमी झाली आहे. हे सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील आहेत.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button