अहमदनगर

महिलांच्या गळ्यातील चोरीचे दागिणे सोनाराकडे मोडायला निघाले; एलसीबीच्या जाळ्यात अडकले

अहमदनगर शहरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरून ते श्रीरामपूर शहरातील सोनाराकडे मोडण्यासाठी घेवुन जाणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

सादक शमलखान इराणी व रियाज फैयाज इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून अहमदनगर शहरातील तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेले 22 ग्रॅम वजनाचे सोन्यासह एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मध्यंतरी अहमदनगर शहरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या. 4 मार्च, 2022 रोजी भिंगार पोलीस ठाणे हद्दीत एक सोनसाखळी चोरीची घटना घडली होती.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. भिंगारसह तोफखाना, कोतवाली हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना दिल्या होत्या.

निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, विजय वेठेकर, दत्ता हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार,

शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सचिन आडबल, विशाल दळवी, राहुल सोळुंके, आकाश काळे, रणजित जाधव, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे यांचे पथक नियुक्त केले.

सादक इराणी हा सोनसाखळी गुन्ह्यात चोरलेले दागिणे मोडण्यासाठी श्रीरामपूर येथील सोनाराकडे येणार असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.

निरीक्षक कटके यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौकात सापळा लावला असता सादक इराणी हा तेथे आला.

त्याच्यासह त्याचा साथीदार रियाज इराणी यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिणे मिळून आले. सोन्याचे दागिणे अहमदनगर शहरातून चोरले असल्याची कबूली त्यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button