Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरजिल्ह्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण झाले पूर्ण...!

जिल्ह्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण झाले पूर्ण…!

Ahmednagar News : राज्य मागास वर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सुरु करण्यात आलेले मराठा व खुला प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षणाचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले आहे.

सर्वेक्षणाचे काम जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशात सर्वेची मोहिम पूर्ण करण्यात आली.

जिल्ह्यातील १४ तालुके, भिंगार छावणी परिषद आणि अहमदनगर महापालिका हद्दीसह हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागास आयोगाची नियुक्ती केली आहे.

आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यात १० लाख कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणासाठी महसूल, प्राथमिक शिक्षक, कृषी तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या प्रगणक-पर्यवेक्षक म्हणून नेमणूका करण्यात आल्या होत्या.

गोखले इन्स्टिट्यूटद्वारे तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे घरोघरी जावून नेमण्यात आलेल्या प्रगणकांनी कुटुंब सर्वेचे काम दि.२३ जानेवारीपासून सुरु केले.

सर्वेची दि.३१ जानेवारीची मुदत वाढवून दि.२ फेब्रुवारी करण्यात आली.आयोगाने निश्चीत केलेल्या कालावधीत सर्वेचे काम पूर्ण झाले असून

संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे गोखले इन्स्टिट्यूट राज्य मागास वर्ग आयोगाला अहवाल सादर करणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments