अहमदनगर

एमआयडीसीत करायचे चोर्‍या, एलसीबीने आवळल्या मुसक्या

अहमदनगर- एमआयडीसीत चोरी करणारी आतंरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. शुभम महादेव खोत (वय 25 रा. राज हॉटेल, वनराई कॉलनी, एमआयडीसी), अक्षय बंडु कुर्‍हाडे (वय 24 रा. वैदुवाडी, भिस्तबाग, सावेडी), राहुल भाऊसाहेब नेटके (वय 20 रा. मनोरमा कॉलनी, नागापूर) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.

 

8 नोव्हेंबर, 2022 रोजी एमआयडीसी येथुन विजय पोपट घोरपडे (वय 40 रा. माऊली बंगला, विद्या टॉवर शेजारी, नगर कल्याण रोड, नगर) यांचा एमआयडीसी येथील प्लॉट नं. 19 जवळ लावलेला मालवाहतुक टेम्पो अज्ञात इसमांनी चोरी करून नेला होता. तसेच त्याच रात्री विजयसिंग गुरदिपसिंग सॅम्बी (वय 65 रा. डॉक्टर्स कॉलनी, बुरूडगाव रोड, नगर) यांच्या कंपनीतील सोलार मोटार पंप, कंट्रोलर व केबल असा दोन्ही गुन्ह्यातील मिळुन एकुण सात लाख 45 हजार 24 रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमांनी चोरून नेला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करत होते. त्यांनी या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोलर मोटार पंप युनिट, टेम्पोसह एकुण सहा लाख 36 हजार 643 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button