अहमदनगर

कृषी विद्यापीठाच्या गोदामातील हरभऱ्याच्या गोण्यांवर चोरट्याने मारला डल्ला

राहुरी तालुक्यातील डिग्रस शिवारात महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील गोदामाच्या खिडकीचे गज कापून आदिनाथ तोडमल याने सुमारे 74 हजार रुपये किंमतीचे हरभरा बियाणे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नितीन उगले यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ तोडमल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरी करत असलेले नितीन शिवाजीराव उगले यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 31 मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपी आदिनाथ तोडमल याने डिग्रस गावाच्या शिवारातील एकात्मिक शेतीपद्धती संशोधन प्रकल्प कार्यालयाच्या गोदामाच्या खिडकीचा गज कापला.

त्यानंतर आरोपीने गोदामामध्ये प्रवेश करून तेथील 74 हजार 400 रुपये किंमतीच्या हरभरा बियाण्याच्या 20 गोण्या कोणाच्याही संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या. दरम्यान गोदामामध्ये चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच नितीन उगले यांनी राहुरी पोलिसात घटनेची माहिती दिली. उगले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button