अहमदनगर

हॉस्पिटलच्या पार्किंगमधून सव्वा तीन लाख चोरणारा एलसीबीने २४ तासात पकडला

मोपेड दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यातील तीन लाख 30 हजाराची रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला २४ तासात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

रमेश रामु कोळी (वय ३२, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश ह. रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या सोबतचा चोरटा अशोक राम गाजवार (रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश) हा पसार झाला आहे.

आरोपी कोळी याच्याकडील तीन लाख १५ हजार रुपये, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी शुक्रवारी दुपारी त्यांची मोपेड पार्क केली होती.

यामध्ये तीन लाख 30 हजाराची रक्कम ठेवली होती. त्यांना ती रक्कम त्यांचे नातेवाईक सुनील कांडेकर यांच्या ऑपरेशनसाठी भरायची होती. दुपारी एक ते अडीच यावेळेत चोरट्यांनी दुचाकी डिक्कीचे लॉक तोडून रक्कम चोरून नेली आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या

सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, पोकॉ जालिंदर माने, योगेश सातपुते व चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने २४ तासात आरोपीला अटक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button