अहमदनगर

चोरटा दुकानात चोरी करत होता अन मालक पाहत होता…मग पुढे घडले असे काही

नेवासा फाटा येथील एका कापड दुकानातून पाच हजार रूपयांची चोरी करताना एका चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. चोरटा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानचा रहिवासी असून सीसीटीव्हीच्या मदतीमुळे हा चोरटा पकडण्यात यश आले.

याबाबाबत अधिक माहिती अशी,  नेवासा फाटा येथील गजानन पवार यांच्या मालकीच्या कापड दुकान आहे. दुपार च्या सुमारास आरोपी सागर नारायण डुकरे (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) हा चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात आला व दुकानात कोणीच नाही असं समजून काउंटरच्या ड्रॉवरमधून 500 रुपयांच्या 10 नोटा असे 5000 रुपये चोरले.

पण दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असल्यामुळे दुकान मालक ही सर्व घटना आपल्या दुसर्‍या दुकानात बसून पाहत होते. त्यामुळे आरोपी सागर डुकरे तेथून चोरी करून पळून जात असतानाच त्याला पाठलाग करून गजानन पवार यांनी पकडले.

आरोपी सागर नारायण डुकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात असून त्याने या परिसरात आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button