तिघांनी तरूणाला लाकडी दांडक्याने केली मारहाण; कारण…

तरूणाला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. वैभव राजेंद्र मिसाळ (वय 30 रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मागील भांडणाच्या कारणातून ही मारहाण झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. मिसाळ यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून मारहाण करणारे रोहन भाऊसाहेब गायकवाड (रा. अरणगाव ता. नगर) व त्याचे दोन अनोळखी मित्र यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी 11:15 वाजता पांजरपोळ समोर ही घटना घडली असून रविवारी रात्री कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सकाळी रोहन गायकवाड याने वैभव मिसाळ यांच्या सोबत असलेल्या मागील भांडणाच्या कारणावरून त्यांना लाकडी दांडक्याने हाता-पायावर मारहाण करून जखमी केले.
तसेच रोहन सोबत असलेल्या इतर दोघांनी वैभव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक योगेश कवाष्टे करीत आहेत.