बहिणीसोबत घरी आलेल्या तिघांनी भावाला केली मारहाण

तिघा जणांनी युवक लखन अनिल घोरपडे (वय 24 रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर) याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण केली. काल रात्री नऊ वाजता सिध्दार्थनगरमध्ये ही घटना घडली.
जखमी घोरपडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माया पांडूरंग लोखंडे (रा. सिध्दार्थनगर), राहुल व आकाश (पूर्ण नावे माहिती नाही, रा. सिध्दार्थनगर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंगळवारी रात्री त्यांच्या घरी होते. नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या बहिणीने आरोपी माया, राहुल व आकाश यांना घरामध्ये आणले. तेव्हा फिर्यादी बहिणीला म्हणाले,‘तु यांना आपल्या घरामध्ये का घेऊन येतेस’, असे विचारल्याचा राग आल्याने तिन्ही आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
जखमी फिर्यादी यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.