अहमदनगर
रेल्वेची समोरून धडक बसली; तरूणाचा मृत्यू

अहमदनगर- रेल्वे गाडीची समोरून धडक बसल्याने अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याने घटना कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारात घडली.
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारा नजीक दौंड-मनमाड रेल्वे मार्ग आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अज्ञात तरुणाला रेल्वेची धडक बसली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा होऊन त्यातुन मोठा रक्तस्राव झाल्याने तो जागीच मयत झाला.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कोपरगाव रेल्वे पोलिसांनी दिलेल्या खबरीवरून मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू करण्यात आली. पुढील तपास कोपरगाव रेल्वे पोलीस एएसआय आंबेकर व पोलीस कॉन्स्टेबल हाऊंदे करीत आहे.