Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगर२०२४ चे रणशिंग मुंबईतून फुंकणार ! मुंबईतील कामोठ्यात आ. निलेश लंके यांचे...

२०२४ चे रणशिंग मुंबईतून फुंकणार ! मुंबईतील कामोठ्यात आ. निलेश लंके यांचे भव्य शक्तिप्रदर्शन, लोकसभेबाबतही पुन्हा सूचक वक्तव्य

आ. निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील वजनदार आमदार म्हणून ओळखले जातात. आगामी लोकसभेला खा. सुजय विखे यांच्याविरोधात आ. लंके उभे राहतील असे नेहमीच चर्चेत राहिले. आता आ. निलेश लंके हे आगामी निवडणुकांच्या तयारीला लागलेले दिसतात. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईमधील कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठे शक्तिप्रदर्शन केले.

राजकारणात काय व्हायचे ते होईल..

राजकारणात काय व्हायचे ते होईल. बऱ्याच लोकांनी तर्क, वितर्क काढले. २०२४ चे रणशिंग मुंबईमधून फुंकणार. लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करणार. राजकारण सुरू असते. समयसे पहिले और भाग्यसे अधिक किसीको कुछ नही मिलता. राजयोग असेल तर झोपेत असेल तरी मिळेल. काहींनी रात्रंदिवस आपटली तरी काहीच होत नाही.

हे महत्वाचे आहे. काय व्हायचे ते होईल. एव्हडे मिळाले तेच बोनस मिळाले आहे. मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते की ग्रामपंचायत सदस्य होईल. आमदार झालो. साडेचार वर्षे झाले तरी आजही विश्‍वास बसत नाही आमदार आहे म्हणून. ही सगळी तुमची कृपा असल्याचे लंके म्हणाले. आमदार झाल्यापासून आतापर्यंत शंभर टक्के समाजासाठी जगलो आहे.

एक रूपयाही घरी घेउन गेलेलो नाही. हे सगळयांना माहीती आहे. कोणी आरोप करीत असेल की याची इकडे जमीन आहे, तिकडे जमीन आहे. त्यात काहीही तथ्य नाही. काही कमविण्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, लोकांच्या हृदयावर राज्य केले पाहिजे हेच महत्वाचे असते असे लंके म्हणाले.

सवंगड्यांचे प्रेम..

माझ्या आई – वडिलांनंतर माझ्यावर जनतेने व माझ्या जिवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांनी प्रेम दिले. कोणत्या प्रकारचे पद अथवा पैसा नसतानाही विधानसभेमध्ये विक्रमी मताने विजयी झालो. निवडणूक व राजकारणात पैसा हे समीकरण असले तरी मुंबईकर व ही माझी माय – बाप जनता व सवंगडी माझे भांडवल असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी कामोठे येथील मेळाव्यात म्हटले.

जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात असा सवाल करतानाच बिगर पैशावाल्यामुळे पैशावाल्याला घाम फुटलाय. पैशावाले फार आहेत. पैशावाले पैशावाल्यांना घाबरत नाहीत,बिगर पैशावाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही असे ते म्हणाले.

कामाची चित्रफीत व पुस्तक

कोरोना काळात आम्ही केलेल्या कामाची चित्रफीत तालुक्यातीलच काही सहकाऱ्यांनी तयार केली असून लवकरच ती प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. तसेच मी अनुभवलेला कोव्हिड या विषयावर आपण एक पुस्तकही लिहीले असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments