अहमदनगर
कंपनीत चोरी करताना दोघांना पकडले

एमआयडीसी परिसरातील साईदीप अॅग्रो कंपनीच्या आवारातून 28 हजार रूपये किंमतीचे लोखंडी मशिनचे रोलर चोरताना दोघांना पकडले.
प्रवीण भिमराव घोलप आणि शरद दिलीप देठे (रा. गणपती मंदिराजवळ, निंबळक ता. नगर) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
या प्रकरणी गोरख गणपत चव्हाण (रा. आंबेडकर चौक, बोल्हेगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरी करणार्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार, 3 एप्रिल, 2022 रोजी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.