भामट्यांनी चक्क भुसा भरलेल्या गोण्याखाली लपविले गोमांस

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह संगमनेर तालुका पोलीसांनी संगमनेरात गोमांस घेऊन जाणारी पिकअप पकडून एकूण तीन लाख नव्वद हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
याप्रकरणी मोसिन अन्वर कुरेशी, तौसिफ ताहिर कुरेशी दोघे (रा. भारतनगर, संगमनेर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर येथून पिकअपमधून गोवंश जनावराचे कत्तल केलेले गोमांस घेऊन संगमनेरकडून वडगाव पान फाटा मार्गे कोपरगाव रोडने नेले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने वडगावपान फाटा ते कोपरगाव जाणाऱ्या रोडवर पहाटे पिकअपची पाहणी केली. पिकअपमध्ये भुसा भरलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या. मात्र, त्याखाली मोठ्या प्रमाणावर गोमांस मिळून आले.
यामध्ये दीड लाख रूपये किंमतीची पिकअप व दोन लाख चाळीस हजार रूपये किंमतीचे बाराशे किलो गोमांस असा एकूण तीन लाख नव्वद हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.