अहमदनगर

महिलेला सोशल मीडियावर अश्‍लिल मेसेज आले आणि…

सोशल मीडियावर महिलेला अश्‍लिल मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे.

उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मेसेज करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूध्द विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर एका मोबाईल नंबरधारकाने अश्‍लिल मेसेज पाठविले. ते मेसेज वाचुन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली व मानसिक त्रास झाला. घडलेल्या घटनेनंतर फिर्यादी महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.

सायबर पोलिसांनी महिलेचा मोबाईल ताब्यात घेत चौकशी केेली. यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button