अहमदनगर

जादा परतावा देण्याचे आमिषाने महिलेला सहा लाखाला फसविले

अहमदनगर- नगर तालुक्यातील अकोळनेर येथील एका महिलेची शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुक केल्यास दररोज दोन टक्के परतावा देण्याचे आमिषाने सहा लाखांची फसवणूक केली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे.

 

फसवणुक झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारी 2020 ते जुलै 2022 दरम्यान ही घटना घडली असून काल फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला होता. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला दररोज दोन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.

 

फिर्यादीने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्यांनी त्या व्यक्तीच्या गुगल-पेवर एकुण सहा लाख तीन हजार 100 रूपये पाठविले. त्या व्यक्तीने फिर्यादी यांना दररोज दोन टक्के परतावा न देता त्यांचे पैसेही परत दिले नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button