अहमदनगर

तरूणाची करामत; बदनामीसाठी तरूणीचे फोटो आणि व्हिडिओ टाकले…

अहमदनगर- बदनामी करण्याच्या उद्देशाने तरूणीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरूणीच्या वडिलांनी फिर्यादी दिली आहे.

 

गणेश दत्तात्रय मुळे (रा. घोगरगाव ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. गणेश मुळे आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गणेशने बदनामी करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ युट्युबवर व्हायरल केले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक टकले अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button