अहमदनगरताज्या बातम्या

यात्रेनिमित्त भरला कुस्त्याचा आखाडा, नामवंत मल्लांनी गाजवला आठवडाचा आखाडा

नगर तालुक्‍यातील आठवड येथील म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यातील नामबंत मल्लांसह हरियाणा, पंजाब, दिल्ली येथील मल्लांनी हजेरी लावली.

रोमहर्षक कुस्त्यांनी आठवडचा आखाडा गाजला. राज्यातील महिला खेळाडूंचा या कुस्ती आखाड्यातील हजेरीने रंगत आणली. नगर तालुक्‍यातील आठवडा येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमीत्त मंगळवार दि.12 रोजी पारंपरीक पध्दतीने यात्रा संपन्न झाली. रात्री छबीना मिरवणूकीनंतर ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सनिता पुणेकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

तत्पूर्वी यात्रेसाठी बाहेरगावांहून आलेल्या पै-पाहुण्यांसाठी यात्रा समितीने उपस्थीतांना वांगभाकरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी म्हसोबा महाराज मंदिरासमोर कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला.

Advertisement

या आखाड्याला सोलापूर, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील मल्लांबरोबरच हरियाणा, पंजाब व दिल्ली येथील मल्लांनी चितपट कुस्त्या करत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.

नृत्यागणाचा केला सन्मान यात्रे निमित्त ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी आणलेल्या सनिता पुणेकर या तमाशा मंडळातील महिला नृत्यांगणा यांचा गावच्या महिला सरपंच सविता सुनील लगड व ग्रामपंचायतच्या महिला सदस्य गंगुबाई दाताळ, स्मिता लगड, स्वाती चोभे, सुवर्णा लगड यांच्यासह महिलांनी हळदी- कुंकवाचा वाण देत त्यांचा सन्मान केला. राज्यातील नामांकित महिला कुस्तीपटूंनी ही आपल्या चमकदार खेळाने आखाडा गाजविला.

आठवड यात्रेसाठी सरपंच सुनिल लगड व उपसरपंच तुकाराम दाताळ यांच्या यात्रेच्या व हगाम्याचे शिस्तबध्द नियोजनातून यात्रा कमेटीच्या सर्व सदस्यांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली. कुस्ती हगाम्यासाठी नामवंत कुस्तीपटू भगवान लगड, अतूल लगड, अशोक चोभे यांनी प्रमुख पंच म्हणून काम पाहिले.

Advertisement

तर कुस्त्या लावण्याचे व सोडण्याचे काम विष्णू घाणमोडे, एकनाथ मोरे यांनी केले. तर मल्लांना बिदागी म्हणून रोख रक्‍कम वाटण्याचे काम किसन मोरे, शरद गुंजाळ, तुकाराम दाताळ, शंकर मोरे, दत्तात्रय लगड, अक्षय गाडे, अक्षय लगड, बापू दाताळ, महादेव दाताळ यांनी पाहिले.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button