अहमदनगर

रिक्षातून जाणार्‍या युवतीचा तरूणाने धरला हात; अन्…

दुचाकीवर आलेल्या तरूणाने युवतीचा हात धरून विनयभंग केला असल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी पीडित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या

फिर्यादीवरून तरूण शोएब शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पंचपीर चावडी, माळीवाडा) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी युवती शेख याला ओळखते. 1 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी फिर्यादी युवती चौपटी कारंजा येथून पायी जात असताना शोएब शेख तेथे आला व युवतीला म्हणाला,‘चल गाडीवर बस’, तेव्हा युवतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

युवती पुढे जाऊन रिक्षात बसली, तेव्हा शोएबने युवतीचा हात धरून गैरवर्तन करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित युवतीने रविवारी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button