तरूण सासुरवाडीला जाण्यासाठी निघाला अन् बेपत्ता झाला

अहमदनगर- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील तरूण कर्जत येथे सासुरवाडीला जाण्यासाठी निघाला असता माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोरून तो बेपत्ता झाला आहे. विकास उत्तम साळवे (वय 38 रा. बाबुर्डी बेंद ता. नगर) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल सिंधु उत्तम साळवे (वय 65 रा. बाबुर्डी बेंद) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विकास साळवे हा 30 जानेवारी, 2023 रोजी कर्जत येथे सासुरवाडीला जाण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोरून निघाला. दरम्यान तो सासुरवाडीला न पोहचता बेपत्ता झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तो मजुरी काम करत असून त्याचा रंग निमगोरा, उंची 173 सेमी, अंगात निळा टी-शर्ट व निळी नाईट पॅन्ट, पायात चप्पल, केस काळे, शरिरबांधा मजबूत आहे.
अशा वर्णनाचा तरूण दिसून आल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.