अहमदनगरताज्या बातम्या

नगरचा तरुण हनीट्रॅपच्या जाळ्यात, घरात घुसून महिलेने केला जादूटोणा

संबंधित तरुणाच्या घरात हळदी-कुंकू, नारळ, काळा दोरा, लिंबू-मिरची, असे साहित्य ठेवत जादूटोणा केल्याचे व तरुणाच्या आईच्या नावावरील प्रॉपर्टी तरुणाच्या नावे करुन देण्याची मागणीही या महिलेने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नगर शहरातील एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवत महिलेने अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले, तसेच हे अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी सदर महिलेने तरुणाच्या आईला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संबंधित तरुणाच्या घरात हळदी-कुंकू, नारळ, काळा दोरा, लिंबू-मिरची, असे साहित्य ठेवत जादूटोणा केल्याचे व तरुणाच्या आईच्या नावावरील प्रॉपर्टी तरुणाच्या नावे करुन देण्याची मागणीही या महिलेने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत तरुणाच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला २३ वर्षांचा मुलगा आहे.

या मुलाला एका महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलाचा विश्वास संपादन करून अश्लील व्हिडीओ काढून पुरावे जमा केले.

त्याच्या आधारे तिने त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यानंतर तू जर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही, तर अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी महिलेने तरुणाला दिली. ही महिला काही दिवसांनी तरुणाच्या घरी गेली. तिने मुलाला कायमस्वरूपी ताब्यात ठेवता यावे,

यासाठी जादूटोणा केला, घराच्या गॅलरीत हळदी-कुंकू लावून दोऱ्याने बांधलेले एक नारळ, काळी बाहुली, लिंबू, टाचण्या व इतर साहित्य ठेवले. या प्रकाराबाबत मुलाच्या आईने महिलेकडे विचारणा केली. त्यावर तू माझ्या नादी लागू नकोस, मला जादूटोणा येतो. तुझ्या मुलाला डांबून ठेवले आहे.

तुझे घर जादूटोणा करून उद्धवस्त करून टाकणार आहे. तुला तुझा मुलगा हवा असेल, तर तुझ्या नावे असलेली सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावे करून दे.

अन्यथा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करीन, अशी धमकी संबंधित महिलेने या तरुणाच्या आईला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भाडेकरू म्हणून आली अन् घरात घुसली

फिर्यादी महिलेचे शहरात एक घर आहे. मुलाच्या सांगण्यावरून हे घर तिने सदर महिलेला भाडेतत्त्वावर दिले. त्यानंतर भाडेकरू म्हणून आलेल्या महिलेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. याबाबत मुलाच्या आईने थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनीट्रॅपबाबत पोलिसांचे आवाहन

नगरमध्ये हॅनीट्रॅपचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. अशा पद्धतीने कुणी बदनामीची धमकी देऊन फसवणूक करत असल्यास संबंधितांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क करावा. चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button