अहमदनगर

लग्नाचा तगादा लावल्याने तरुणीने संपविले जीवन; नगर शहरातील घटना

लग्न करण्यासाठी तरूणीकडे लावलेल्या तगाद्याला कंटाळून तरूणीने आत्महत्या केल्याची घटना नगर शहरातील चितळेरोड येथे घडली आहे.

या संदर्भात तरूणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात इंद्रजित राजू माणकेश्वर (वय १९, रा. श्री गणेशकॉलनी, आलमगीर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धी शरद मुनगेल (वय १६) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान अधिक माहिती अशी, मृत सिद्धी अकरावीत शिक्षण घेत होती. सिद्धीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शवविच्छेदनासाठी शव जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे आरोपी इंद्रजित माणकेश्वर मृतदेहाजवळ जाऊन बोलत होता. मृत सिद्धीच्या कुटुंबियांनी हे पाहिले.

त्यानंतर आरोपी माणकेश्वर याचा मोबाईल तपासला असता त्यात तिला मेसेज केल्याचे आढळले. लग्नासाठी आरोपी इंद्रजित माणकेश्वर याने तगादा लावल्याने सिद्धीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button