अहमदनगर

‘क्विकसपोर्ट’ अ‍ॅपवर बँकेची माहिती भरल्याने तरूणीची अशी झाली फसवणूक

अहमदनगर- फसवणुकीसाठी सायबर चोरटे नवनवीन कल्पना वापरतात. वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या नावे आलेल्या फोनला प्रतिसाद देऊन ‘क्विकसपोर्ट’ अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले व त्यावर बँक खात्याची माहिती भरल्याने तरूणीच्या खात्यातून 36 हजार 925 रूपये काढून घेत फसवणुक केली.

 

रविवारी रात्री ही घटना घडली असून यासंदर्भात सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूजा मधुकर त्रिबंके (वय 25 रा. आयटीआयचे पाठीमागे, बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

 

रविवारी दुपारी फिर्यादी यांचा भाऊ प्रशांत यांचे मोबाईल नंबरवर मेसेज आला की, तुमचे वीज बिल भरा अन्यथा तुमचे घरातील वीज कनेक्शन रात्री साडे दहा वाजता कट केले जाईल. पावर हाऊस कस्टमर आयडी एमीडीएटली थॅक्यु असा मेसेज आल्याने भाऊ प्रशांत याने फिर्यादींच्या मोबाईलवर तो मेसेज पाठविला. त्यानंतर फिर्यादी यांनी त्या नंबरवर फोन केला असता समोरच्या व्यक्तीने त्यांना महावितरण आणि ‘क्विकसपोर्ट’ हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

 

फिर्यादी यांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे त्यांनी अ‍ॅपमध्ये ग्राहक क्रमांक, बिलाची रक्कम एक हजार 930 रूपये, एटीएम कार्डचे शेवटचे 4 अंक, एटीएमचा सीव्हीव्ही नंबर टाकला. त्यानंतर पाच मिनीटांनी 19 हजार 995, 15000 हजार रूपये एवढी रक्कम खात्यावरून कट झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर फसवणुक झाल्याची शंका फिर्यादी यांना आली. परंतु तोपर्यंत त्यांच्या खात्यातून 36 हजार 925 रूपये कट झाले होते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button