अहमदनगर

उघड्या घरातून दोन लॅपटॉप, तीन मोबाईलची चोरी

घराचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्याने तीन मोबाईलसह दोन लॅपटॉप चोरून नेले. आज सकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत लालटाकी येथील नारायण चेंबर्स येथे ही घटना घडली.

या प्रकरणी तेजस सुरेशप्रसाद तिवारी (वय 34 रा. लालटाकी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दूधवाला येऊन गेल्यावर घराचा दरवाजा आतून लॉक न करता लोटला. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तिवारी यांना जाग आल्यावर त्यांना मोबाईल दिसून आले नाहीत.

तसेच घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. शेजारी राहणार्‍यांनी दरवाजा उघडला. तिवारी यांनी पुन्हा घरात जावून पाहिले असता घरातील तीन मोबाइल व दोन लॅपटॉप चोरीला गेल्याचे समोर आले.

त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button