Health Tips : केसातील कोंडा कमी करण्यासाठी असे आहेत घरगुती उपाय
तसेच डोक्याला खूप खाज सुटते, त्यावर उपचारांची गरज असते. कोंडा घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, त्यामुळे केसांच्या समस्या कमी होऊन फरक पडू शकतो

Health Tips : केसातील कोंडा ही समस्या सामान्य झाली आहे. अनेकांच्या केसात कोंडा होतो. कोंडा झाल्यानंतर काहींना रुक्ष त्वचेचे पापुद्रे मोठ्या प्रमाणात केसांवर दिसतात.
तसेच डोक्याला खूप खाज सुटते, त्यावर उपचारांची गरज असते. कोंडा घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, त्यामुळे केसांच्या समस्या कमी होऊन फरक पडू शकतो
केसात कोंडा कशामुळे होतो ?
वातावरणातील बदल, हवा, धूळ व प्रदूषण आणि इतरही काही कारणांनी केसातील कोंड्याची समस्या वाढते. अशावेळी लवकर उपचार न केल्यास केस गळणे,
तुटणे अशा समस्या सुरु होतात. केसांच्या मुळाशी असलेले त्वचेचे आवरण म्हणजे स्कॅल्प होय, त्यावरील सर्वात पातळ आवरणामुळे कोंडा होण्याची समस्या उद्भवते, डोक्याला खाज सुटणे, वारंवार स्वाजविल्याने स्कॅल्पमधील त्वचा निघते
केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस एकत्र करा आणि अंघोळ करण्याच्या साधारण एक तास आधी हे मिश्रण केसांना लावा. १०० ग्रॅम नारळाच्या तेलात ४ ग्रॅम कापूर एकत्र करा आणि बाटलीत भरून ठेवा,
दिवसांतून दोन वेळा त्याने केसांना मालिश करा. केस धुतल्यानंतर सुकवून आणि तेल लावून पुन्हा मालिश करा. रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा तेल लावा. काही दिवसांमध्ये कोंडा कमी होईल.
■अनेकांना केसांमध्ये वारंवार हात फिरविण्याची सवय असते. अशा सवयीमुळे हातावर असलेले कीटाणू केसांमध्ये जाऊन कोंडा वाढवितात. वारंवार केसांमध्ये हात फिरवू नये. केस धुतल्यानंतर ते पुसण्यासाठी स्वच्छ व मऊ रुमाल वापरावा. केमिकलयुक्त पदार्थाचा वापर केसांमध्ये करणे टाळावे. केस गळती आणि कोंडा कमी करण्यासाठी बाजारात असलेल्या योग्य उत्पादनांचा वापर करावा. परंतु, ही उत्पादने आपल्या केसांसाठी योग्य आहेत का ? हेही पाहणे गरजेचे आहे.
कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपाय काय ?
कोंडा कुठल्याही वयात होऊ शकतो. अगदी नवजात बालकांमध्येही तो दिसतो. कोंडा घालविण्यासाठी घरगुती उपाय आहेत. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस समान प्रमाणात एकत्र करून घ्या,
टाळूवर हळुवार मसाज करा. १०-१५ मिनिटानंतर केस चांगले धुवा. यामुळे केवळ कोंडाच नाही तर केसांची वाढ आणि पोषणदेखील होईल. तसेच भरपूर पाणी प्यावे. पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे