लेटेस्ट

भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप 5 बाईक्स

देशात दिवसेंदिवस महागाई उच्चांक गाठत आहे. यातच इंधनाचे दर देखील वाढत आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही बाईक्स बाबत सांगणार आहोत ज्यांचा मायलेज ऐकून तुम्हीही आश्चर्य चकित व्हाल…

या आहेत त्या टॉप 5 बाईक्स  

Hero Splendor Pro : हिरो स्पेंडर लाँच झाल्यापासून भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. ARAI नुसार स्प्लेंडर 90 kmpl चा मायलेज देते. या मोटरसायकल 97.2cc सिंगल-सिलेंडर इंजिन असून ते 8.24 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हिरो स्पेंडर विविध व्हेरियंटमध्ये येते. त्यामध्ये Pro, Plus, i3S आणि iSmart 110 चा समावेश आहे.

बजाज CT 100 : कमी किंमत आणि उत्कृष्ट मायलेज हे या बाईकचं वैशिष्ट्य आहे. ARAI नुसार तिचे मायलेज 89 kmpl आहे. बाईकचं102 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन सुमारे 8 hp पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क जनरेट करते.

TVS स्टार सिटी प्लस : हि बाईक 86kmpl च्या मायलेज देते. स्टार सिटी प्लस दोन प्रकारांमध्ये येते – ES ड्रम आणि टॉप व्हेरिएंट स्टार सिटी प्लस ES डिस्क या बाइकमध्ये चार-स्ट्रोक इंजिन असून ते 8.19 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते.

बजाज प्लॅटिना : बजाज प्लॅटिना ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. ARAI नुसार Platina 110 चे मायलेज 80kmpl आहे. या मोटरसायकलला पॉवरिंग 115 cc, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक इंजेक्शनसह एअर-कूल्ड इंजिन आहे. त्याचे इंजिन 7000 rpm वर 8.6 PS कमाल पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 Nm पीक टॉर्क निर्माण करते.

Honda CD 110 Dream : या बाईकचे मायलेज 74kmpl आहे. यात BS6 अनुरूप 109.51cc CT 100 इंजिन आहे. हे इंजिन 7500 rpm वर 8.6hp ची पॉवर आणि 5500 rpm वर 9.30 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. BS6 Honda CD 110 Dream बाईक स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button