उड्डाणपुलावरून जाण्यास ‘यांना’ बंदी; एसपींनी काढले आदेश

अहमदनगर- 19 नोव्हेंबर रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असून सदर उड्डाणपुल सार्वजनिक वाहतुकीकरीता खुला करण्यात आलेला आहे.
पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून पुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून किंवा सदर उड्डाणपुलावरून हातगाडीसह प्रवास करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे.
आता यापुढे शुक्रवार 25 नोव्हेंबर सकाळी आठ वाजेपासून उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी फेरीवाले, ठेलेवाले व जनावरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढला आहे.
उड्डाणपुलावरून पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून व्यावसायक करत असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही इसम जनावरे घेवुन जात असुन, काही उत्साही पादचारी हे उड्डाणपुलावर थांबुन सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.