अहमदनगर
Ahmednagar Crime : ‘आपले सरकार सेवा’ केंद्रावर चोरट्यांचा डल्ला

Ahmednagar Crime :मांजरसुंबा (ता. नगर) गावात असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. तेथून 26 हजार 800 रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लहानु कदम (वय 25 रा. मांजरसुंबा) यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवारी रात्री आठ वाजता ते गुरूवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी आपले सरकार सेवा केंद्र फोडून कॉम्प्युटर मॉनिटर, प्रिंटर, फिंगरप्रिंटचे मशीन,
लॅनिनेशन मशीन, लॅपटॉपचे चार्जर, केबल व रोख रक्कम असा 26 हजार 800 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कावरे करीत आहेत.