अहमदनगरलेटेस्ट

शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला…! भरदिवसा कुलूप तोडून अडीच लाखांचा ऐवज केला लंपास

भरदिवसा चोरीच्या प्रकाराने नागरीक व पोलिसही वैतागले आहेत. एकीकडे वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत मात्र दुसरीकडे या चोऱ्यांचा तपास काही लागत नाही.

अशी स्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच पाथर्डी तालुक्यातील तिनखडी या गावातील शेतकरी शेतात गेल्यानंतर दिवसा घराचे कुलुप तोडुन दहा हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागीने असा २ लाख ५३ हजार ७५० रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनीभरदिवसा चोरुन नेला.

पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञाला बोलविले. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. चो-यांचे सत्र थांबता थांबेना व पोलिसांना चोरांचा तपास लागेना अशी अवस्था झाली आहे.

आमदार राजळेंनी पोलिसांना कार्यपद्धती सुधारा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतरही चोरीचे सत्र सुरुच आहे.

तिनखडी येथील उत्तम नानाजी खेडकर हे टाकळीमानुर ते पाथर्डी रस्त्यालगत वस्तीवर राहतात. खेडकर व त्यांची पत्नी आणि मुलगा शेतात काम करण्यासाठी गेले होते.

जाताना त्यांनी घराला कुलुप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडले घरातील पेटीतील दहा हजाराची रोख रकक्म व सोन्याचे दागीने असा२ लाख ५३हजार ७५० रुपयाचा ऐवज चोरुन नेला.

सायकांळी पाच वाजता मुलगा घरी आला असता त्याला घराचे दार उघडे दिसले. चोरट्यांनी कुलुप तोडलेले होते. आतमधे पाहीले तर पेटीतील दागीने पैसे गेले होते. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहीती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button