अहमदनगर

राज्य उत्पादन शुल्कच्या जप्त मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला; काय नेले चोरून?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक कार्यालयाच्या आवारात लावलेल्या गुन्ह्यात जप्त केलेल्या दोन दुचाकीं चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निरीक्षक निलेश मोहन शिंदे (वय 33 रा. बोरूडेमळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गांजा डेपो आवारात दाखल गुन्ह्यामधील जप्त दुचाकीं उभ्या करण्यात आलेल्या होत्या. परंतु शनिवार (दि. 14) व रविवार (दि. 15) रोजी सलग सुट्ट्या असल्याने कार्यालय बंद होते.

सोमवारी कार्यालयाचे आवारात गुन्ह्यातील जप्त दुचाकी दिसून येत नसल्याचे निरीक्षक राख, दुय्यम निरीक्षक प्रदिप झुंझरूक, जवान पवार, जवान योगेश मडके, जवान प्रविण सागर, जवान वाहन चालक पांडुरंग गदादे यांच्या लक्षात आले.

या दुचाकींचा सर्वत्र शोध घेतला परंतु त्या कोठेही मिळु आल्या नाही. राजेंद्र सुरेश तळेकर यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल आणि रूपचंद कळमकर यांच्या मालकीची यमाहा कंपनीची फसिनो मोपेड दुचाकी अशा 20 हजार रुपयांच्या दुचाकीं चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. पोलीस नाईक गाडगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button