अहमदनगर

घरात घुसून चोरट्यांनी दाम्पत्याला मारहाण करत रोकड लांबवली

अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरुन दाम्पत्याला गज व चाकूसारख्या हत्याराने मारहाण करुन चोरी केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी सोमनाथ यादव क्षीरसागर, (वय 40), धंदा- शेती यांनी फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 26 एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोधेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी तिघे अज्ञात चोरटे आले.

त्यातील एकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करुन घरामधील सामानाची उचकापाचक करून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी फिर्यादी व त्याची पत्नी अशांनी त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीस त्याचेकडील असलेल्या लोखंडी गजाने व चाकुसारख्या काहीतरी धारदार हत्याराने हाता पायावर डोक्यावर मारहाण करून जखमी करून फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये घेऊन पळून गेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button