अहमदनगर

चक्क महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराचं घर चोरटयांनी फोडलं…मात्र

चंद्रपूरमध्ये चक्क काँग्रेसचे खासदार असणाऱ्या बाळू धानोरकरांच्या घरावरच चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. खासदाराच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर अशी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी हा चोरीचा प्रयत्न करण्यापूर्वी चोरांनी घराची रेकी केलेली.

घरामध्ये कोणीही नाही या उद्देशाने त्यांनी घरावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. धनोरकरांच्या सूर्यकिरण नावाच्या बंगल्यावर हा संपूर्ण प्रकार घडलाय.

चोरांनी मुख्य दाराचं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. खासदाराच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.

या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी दोन घरफोड्या केल्याची माहिती समोर आलीय. बंगल्यामधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आलं.

या बंगल्यामध्ये कोणातेही मौल्यवान साहित्य नसल्याने चोरांचा डाव फसल्याने धानोरकर यांना मोठं नुकसान झालं नाही. मात्र चोरांनी बंगल्यात फार नासधूस केलीय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button