अहमदनगर

उघड्या घरात पहाटे चोरटे घुसले आणि तीन तोळे लंपास केले

उन्हाळ्याच्या दिवसात घर उघडे ठेऊन झोपणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. अहमदनगर शहरातील आगरकर मळ्यातील बेलेश्वर कॉलनीमध्ये राहत असलेले अ

निकेत अशोक दराडे (वय 19) यांच्या उघडे असलेल्या घरातून चोरट्यांनी आत प्रवेश करून तीन तोळ्याचे गंठण, दोन मोबाईल असा 35 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. 7 मे रोजी पहाटे ही घटना घडली असून

10 मे रोजी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दराडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दराडे कुटुंब घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले होते.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन मोबाईल व तीन तोळ्याचे गंठण चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button