अहमदनगर
घरासमोर लावलेली ट्रक चोरट्यांनी पळविली

घरासमोर लावलेली मिनी ट्रक चोरीला गेली. भिंगार उपनगरातील महात्मा कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश साहेबराव तोरडमल (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी घरासमोर मिनी ट्रक (एमएच 16 एवाय 5187) सुमारे दोन लाख रूपये किंमतीची उभी केली होती.
चोरट्यांनी मंगळवारी सकाळी 11 ते बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान या ट्रकची चोरी केली.
तोरडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राहुल द्वारके पुढील तपास करीत आहेत.