ताज्या बातम्या

इलेक्ट्रिक कार आणि बाईक घ्यायचा विचार करताय ? मग आधी ही माहिती वाचाच…

जिल्ह्यात मागील दोन तीन वर्षामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यांवर मोठ्या संख्येने दिसत आहेत. काही जणांकडे इलेक्ट्रिक कारही दिसून येत आहेत.

पेट्रोलच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. पुढील काळात हे दर घटण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे वीजही महाग होत चालली आहे. मात्र, पेट्रोलच्या तुलनेत ती खूप स्वस्त आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांचा ओढा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे आहे.

जिल्ह्यात मागील दोन तीन वर्षामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यांवर मोठ्या संख्येने दिसत आहेत. काही जणांकडे इलेक्ट्रिक कारही दिसून येत आहेत.

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणारा भाग हा निमशहरी व ग्रामीण मानला जातो. मात्र, येथील ग्राहकांचा कल महानगरांप्रमाणे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे दिसून येतो. दुचाकी कार यासोबतच ई- रिक्षाही येथे नोंदविण्यात आल्या आहेत.

Advertisement

वीज महागली असली तरी पेट्रोलच्या तुलनेत सध्यातरी परवडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ई रिक्षा, कार यांच्या तुलनेत दुचाकींची संख्या जास्त आहे. शहरात फिरण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करत आहेत.यामध्ये महाविद्यालयीन तरुणांची संख्या मोठी आहे. ही क्रेझ अद्याप कायम आहे.

२०२३च्या प्रारंभी १४२ इलेक्ट्रिक वाहने

■यावर्षी जानेवारी २०२३ या पहिल्याच महिन्यामध्ये श्रीरामपूर आरटीओ कार्यालयांतर्गत १३९ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली.

Advertisement

■ याशिवाय तीन कारची विक्री झाली होती.

■ त्यानंतर सातत्याने इलेक्ट्रिक वाहनांची यात भर पडत आहे.

सवलतींचा पाऊस

Advertisement

■ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने काही सवलती दिल्या आहेत.

■यामुळे या वाहनांची किमत कमी झाली होती.

■ याशिवाय कंपन्यांकडूनही विविध घोषणा, सवलती दिल्या जात आहेत.

Advertisement

इंधन दरवाढीने चिंता

पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, वाहनधारक अडचणीत आले आहेत. सध्या एक लिटर पेट्रोलसाठी १०७ रुपये दर आहे. दुष्काळी स्थितीमध्ये हा हिशेब ठेवावा लागतो. गेल्या पाच वर्षामध्ये पेट्रोल शंभरी पार झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे

चार्जिंग स्टेशन मात्र कमी

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली असली तरी त्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन मात्र नव्याने निर्माण होत नाहीत. त्यामुळे अनेकजण अजूनही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास तयार नाहीत, ते प्रतीक्षा करत आहेत.

शहरामध्ये फिरण्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्तम पर्याय आहे. पेट्रोलचा विनाकारण खर्च करण्यात अर्थ नाही. नवीन इलेक्ट्रिक दुचाकी या अधिक आरामदायी आल्या आहेत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button