अहमदनगर

थर्टी फर्स्ट; 102 झिंगाट मद्यपींवर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाया करण्यात आल्या. दारू पिऊन वाहने चालविणार्‍या 102 वाहन चालकांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाया केल्या आहेत.

 

काही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

 

सरत्या वर्षाला निरोप देऊन, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील हॉटेल व बारमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नगर शहरासह जिल्हाभरात नाकेबंदी केली होती. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून वाहन चालकांची तपासणी केली जात होती.

 

तपासणी दरम्यान नगर शहर व जिल्ह्यात दारू पिऊन वाहने चालविणार्‍या 102 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे ओला यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button