अहमदनगर

वर्ग दोनच्या जमिनीवर देण्यात येणाऱ्या पीक कर्जाबाबत जिल्हा बॅंकेने घेतला हा निर्णय

अहमदनगर- जिल्हा बँक कार्यकारी मंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. शेती महामंडळ, पुनर्वसन म्हणून मिळालेल्या जमिनी, स्वातंत्र्य सैनिकांना मिळालेल्या जमिनी यावर आता ई-करार करून जिल्हा बँक पिक कर्ज देणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळाची काल बैठक झाली. बैठकीला उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, अरूण तनपुरे, गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड आणि सीईओ रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

 

बैठकीत वर्ग दोनच्या जमिनीवर देण्यात येणाऱ्या पीक कर्ज आणि त्याबाबतच्या अडचणीवर चर्चा झाली. पूर्वी बँक स्टॅम्प पेपर लिहून घेऊन वर्ग दोनच्या जमिनीवर पीक कर्ज देत होती. मात्र, हे कर्ज दिल्यानंतर परतफेडीच्या वेळी तक्रारी होत होत्या. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने ई-करार करूनच वर्ग दोनच्या जमिनीवर पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

यामुळे श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना तर शेवगाव तालुक्यातील पुनर्वसन होवून जमिनी मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button