अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल !

नगर तालुक्यातील जेऊर गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून, प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा फायदा गावाला कोरोनामुक्तीकडे वाटचाल करण्यास झाल्याचे चित्र गावात दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्च महिन्यापासून जेऊर येथे कोरोनाने कहर केला होता. येथे तीन महिन्यात ६८७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते. २८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सध्या केवळ ६ सक्रीय रुग्ण आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सर्वच ग्रामस्थांनी कोरोनाची धास्ती घेतली होती.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू होते. आरोग्य विभाग, महसूल, पोलिस, पंचायत समिती मार्फत विविध योजना राबविल्या जात होत्या. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील,
गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे, मंडळाधिकारी वृषाली करोसिया, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश कर्डिले, डॉ.सुप्रिया थोरबोले, तलाठी गणेश आगळे, पोलीस प्रशासन कोरोनाकाळात अथक परिश्रम घेतले.
सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, माजी उपसरपंच बंडू पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावात कोरोनाकाळात महत्त्वपुर्ण निर्णय घेतले. त्याचा परिणाम आज गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.