पाण्याच्या वादातून धमकावले… पुन्हा आमच्या नादाला लागला तर मारून टाकू

सामायिक शेतीच्या विहिरीतील पाणी उपसल्याच्या कारणातून मारुती रंगनाथ गाडीवान, यांना लोखंडी गज व काठ्यांनी जबर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना शेवगाव तालुक्यातील मुरमी येथे घडली.
याप्रकरणी रोहिदास भोसलेसह पाच जणांवर शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील मुरमी येथील मारुती रंगनाथ गाडीवान (वय ७५) यांची मुरमी शिवारात शेती असून, गटनंबर ४० मध्ये सामाविक विहोर आहे.
दि.३ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. मारुती गाडीवान हे घरी असताना अमोल रोहिदास भोसले, सोमनाथ रोहिदास भोसले, रोहिदास भीमराव भोसले, भीमराव शामराव भोसले सर्वं रा. मुरमी व रोहिदास भोसले यांच्या मेहुणीचा मुलगा जालिंदर हे आमच्या घरी आले.
घरी येऊन आमची पाण्याची बारी असताना तुम्ही विहिरीतील पाणी का उपसले, असे म्हणाले, त्यावर मी आजचा दिवस माझी बारी आहे. तुम्ही उद्यापासून विहिरीचे पाणी उपसा, असे सांगत असतानाच अमोल रोहिदास भोसले याने लोखंडी गजाने मारहाण केल्याने माझा डावा हात फॅक्चर झाला.
या वेळी सोमनाथ रोहिदास भोसले यांनी लाकडी दांडका माझ्या पाठीत मारला तर जालिंदर याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी पत्नी शारदा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता,
रोहिदास भीमराव भोसले व भीमराव रामराव भोसले यांनी तिला ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुन्हा आमच्या नादाला लागला तर मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.