अहमदनगर

धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्हायरल Audio क्लिप प्रकरणी नेवासा तालुक्यात बंद

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व उदयन गडाख यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी नेवासा शहर व तालुक्यात तालुक्यात बंद पुकारण्यात आला.

दरम्यान या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी घटनेचा निषेध करण्यात येऊन बंद पाळण्यात आला आहे. मंत्री गडाखांबाबत जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती.

तसेच मंत्री गडाखांच्या पीए वर देखील बेछूट गोळीबार करण्यात आला होता. आता याच घटनेच्या निषेधार्थ गावोगावी निषेध सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

झालेले कृती ही लोकशाहीच्या दृष्टीने घातकी असून अशा प्रकारचे कृत्य होणे योग्य नाही अशा शब्दात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गडाख यांना जिवे मारण्याचा कट रचणारी ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसापासून व्हायरल झाली असुन कट रचणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी शहरासह उपनगरांमध्ये सर्व व्यवसाईकांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येवुन घटनेचा निषेध केला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद… बारा वाड्या ,खेडले परमानंद घोडेगाव, चांदा, कौठा, खरवंडी, नेवासा, नेवासा परिसरातील अनेक गावे, करजगाव, निंबरी ,पानेगाव, सलबतपुर, शिरसगाव, देवगाव, कुकाना ,भेंडा, खूपटी, शनिशिंगणापूर, मिरी- माका, वरखेड, शिरेगाव, प्रवरा संगम, पाचेगाव, पुनतगाव,खेडले काजळी, देवगड, बाभळगाव,वडाळा, मोरया चिंचोरे,लोहगाव,सुरेगाव,पिंपळगाव आदी ठिकाणी बंद पाळण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button