अहमदनगर ब्रेकिंग : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार गावात निषेध अन् तणावपूर्ण स्थिती !

अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ येथील तेवीस वर्षीय तरुणीवर तुझे फोटो व्हायरल करेन. तसेच मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे,
असे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर कोतुळात घोषणा व निषेध नोंदविला गेल्याने दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे.
कोतूळ येथील आतीक सादिक मनियार या तरुणाची गावात नोकरी निमित्त आलेल्या एका कुटुंबातील २३ वर्षीय तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली.
वेगवेगळी आमिषे दाखवून संबंधित तरुणाने सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले. सोमवारी दुपारी सदर तरुणाच्या घरातील सदस्य बाहेरगावी गेले असता त्याने तरुणीला घरी बोलावून घेतले. सदर घटना गावातील काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी थेट घरात प्रवेश केला.
यावेळी आरोपी व तरुणात बाचाबाची झाली. काही क्षणात मोठा जमाव जमला. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली, तर आरोपीस काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले व पोलिसांना कळवले.
पोलिस निरीक्षक सुभाष भोये उपनिरीक्षक भुषण हांडोरे व पाच सहा पोलिस कर्मचारी घटनास्थळी आल्याने मोठा अनर्थ टळला. पीडित तरुणीने आपल्या नातेवाइकांसह जाऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक केली आहे. दरम्यान मुख्य चौकातील काही दुकाने,
शाळा महाविद्यालयाचे मार्ग, टपन्यांसमोर दिवसभर दुचाकी उभ्या असतात. त्यातील काही तरुण गुटखा, गांजा, दारूचे व्यसन करून घोटाळत असतात, विशेष म्हणजे यातील काही तरुण रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात, सोमवारच्या घटनेलाही अशाच परिस्थितीचा संदर्भ असल्याची चर्चा आहे.