Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात टोळक्याची तिघांना मारहाण

Ahmednagar News : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात टोळक्याची तिघांना मारहाण

Ahmednagar News :सात जणांच्या टोळक्याने येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या पार्किंगमध्येच बाप-लेकासह पुतण्याला लाकडी दांडके, चाकूने मारहाण केली.

बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी शरद दिगंबर शिंदे (वय ५५ रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश ससाणे, विजू पठारे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. सिध्दार्थनगर) व इतर पाच अनोळखी इसम यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी फिर्यादी व त्यांचा पुतण्या रोहित व मुलगा सोनू जिल्हा शासकीय रूग्णालयात फिर्यादीच्या चुलतीचा मृत्यू दाखला काढण्यासाठी आले होते.

त्यावेळी निलेश ससाणे याने त्याची दुचाकी जोरात चालवून फिर्यादी जवळ थांबवली. फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्याचा राग आल्याने त्याने हातातील चाकूने मुलगा सोनूवर वार करून त्याला जखमी केले.

तसेच इतर पाच अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांच्या पुतण्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

विजू पठारे याने फिर्यादीला मारहाण करून मुलगा सोनू याला, ‘तू जास्त नाटके केले तर तुला मारून टाकीन’ अशी धमकी दिल. अधिक तपास अंमलदार जालींदर आव्हाड करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments