Tombs in India : सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या आहेत भारतातील ५ सुंदर समाधी, एकदा अवश्य भेट द्या
तुम्हीही भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा. कारण तुम्ही देशातील अशा ५ समाधींना भेट देऊ शकता ज्या ठिकाणी जगभरातून पर्यटक येत असतात.

Tombs in India : भारत हा विविध सुंदरतेने आणि प्राचीन वारसा असलेला देश आहे. भारतात असे अनेक प्राचीन वास्तू आहेत जे पाहायला दरवर्षी लाखो लोक गर्दी करत असतात. भारताची संस्कृती आणि परंपरा जगभर प्रसिद्ध आहे.
जगभरातून अनेक पर्यटक भारताची संस्कृती आणि प्राचीन वास्तू पाहायला येत असतात. भारतात असे अनेक किल्ले आणि इतर प्राचीन वास्तू आहेत जे जगभर प्रसिद्ध आहेत. ते पाहण्यासाठी आजही लोक अशा ठिकाणी गर्दी करत असतात.
तुम्हाला भारतात इस्लामिक वास्तुकला पाहण्याची देखील संधी मिळत आहे. तसेच भारतात मुघल वास्तुकला देखील पाहायला मिळतील. आज तुम्हाला भारतातील अशा ५ सुंदर समाधीबद्दल सांगणार आहोत.
ताज महाल
ताज महाल हे प्रेमाचे प्रतीक आहे असे मानले जाते. ताज महाल हा आग्रा, उत्तर प्रदेश येथे स्थित जगातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध समाधी आहे. मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताज महाल बनवला आहे. या ठिकाणी तुम्हाला मुमताज आणि शाहजहान यांच्या कबरही पाहायला मिळतील.
हुमायूनची कबर
मुघल सम्राट यांनी दिल्ली येथे हुमायूंचा मकबरा ही हुमायूनसाठी बांधलेली एक भव्य समाधी आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी तुम्हाला भव्य आणि निर्मळ बागा पाहायला मिळतील.
गोल गुम्बाज
आदिल शाही घराण्याचे शासक मोहम्मद आदिल शाह यांची समाधी म्हणून गोल गुम्बाझ ला ओळखले जाते. हे गोल गुम्बाझ कर्नाटक स्थिती विजापूरमध्ये आहे. ही एक अद्वितीय वास्तुशिल्प रचना आहे. गोल गुम्बाज हे त्याच्या विशाल घुमटासाठी ओळखली जाते.
कुतुबमिनार
कुतुबमिनार ही एक भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर समाधींपैकी एक आहे. कुतुबमिनार दिल्लीमध्ये स्थित आहे. हा मुख्यतः त्याच्या विशाल मिनारासाठी ओळखला जातो. या ठिकाणी कुव्वत-उल-इस्लाम मशीद आणि दिल्ली सल्तनतचा दुसरा शासक इल्तुतमिशची कबर आहे.
सफदरजंगची कबर
मुघल साम्राज्यातील प्रमुख राजकारणी नवाब सफदरजंग यांचे विश्रामस्थान म्हणून सफदरजंगला ओळखले जाते. तसेच त्याची कंबर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी समाधीच्या वास्तूंमध्ये तुम्ही मुघल आणि पर्शियन शैली पाहू शकता. या समाधी स्थळाला देखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.