Top 5 Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 आहेत सर्वोत्तम योजना, गुंतवणूक कराल तर मिळतील फायदेच- फायदे
पोस्ट ऑफिस लहान बचत योजना, ज्याद्वारे तुम्ही मोठी बचत करू शकता. या योजनांमध्ये कर लाभ उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय देतात.

Top 5 Post Office Schemes : तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांबद्दल माहित असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा 5 योजनांबद्दल सांगणार आहे ज्या लहान बचत योजना असून त्यात तुम्ही मोठी बचत करू शकता.
आजकाल बचत करणे हे खूप गरजेचे झाले आहे. कारण तुम्ही आर्थिक संकटाच्या काळात पैशांची केलेली बचत वापरू शकता. त्यामुळे सर्वात जास्त नोकरी करणारे लोक बचत करत असतात.
यामुळे आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून चालवल्या जाणार्या अशा पाच जबरदस्त योजनांबद्दल सांगत आहोत, ज्या तुमच्या गुंतवणुकीवर बँकांपेक्षा अधिक व्याज तर देतातच, पण तुम्हाला उत्कृष्ट कर सवलतीचा लाभही देतात.
यामध्ये PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना, राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना यांचा समावेश आहे.
पीपीएफ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना
PPF किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही भारतात प्रचलित असलेल्या सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. PPF देखील कर लाभ प्रदान करते, कारण ते एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट (EEE) श्रेणी अंतर्गत येते. याचा अर्थ असा की पहिल्या वर्षी, ज्या वर्षी पीपीएफमध्ये गुंतवणूक केली जाईल, त्या व्यक्तीला कर सवलत मिळेल (कलम 80C अंतर्गत).
तसेच, गुंतवणुकीच्या रकमेसह पीपीएफ ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागणार नाही. पीपीएफचा व्याजदर सरकार दर तिमाहीत ठरवते. वर्ष 2023/2024 च्या पहिल्या तिमाहीसाठी PPF चा व्याज दर 7.1 टक्के आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) च्या गुंतवणूकदारांसाठी सरकारने गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. आता वैयक्तिक खातेदार 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतील.
संयुक्त खातेदारांसाठी गुंतवणुकीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकार या पोस्ट ऑफिस योजनेच्या गुंतवणूकदारांना 7.1 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळवण्याची संधी असते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
यापैकी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) चा एक उत्तम पर्याय आहे. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. सरकारने 1 एप्रिल 2023 पासून बचतीवरील व्याजदरात बदल केले आहेत.
NSC चे व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.7 टक्के प्रतिवर्ष केले आहेत. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना यामध्ये मोठा फायदा होणार आहे. या पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकीची कमाल मर्यादा नाही. त्याचबरोबर यामध्ये अनेक खाती उघडता येतात.
सुकन्या समृद्धी योजना
पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. पालकांना त्याच्या/तिच्या दोन मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची परवानगी आहे. सध्या, सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या लहान बचत योजनांप्रमाणेच एक वेळची बचत योजना आहे. या योजनेद्वारे दोन वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल.
महिला सन्मान बचत पत्र योजनेंतर्गत या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना दोन लाखांच्या बचतीवर 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. यातून महिला भविष्यात बचत करून स्वावलंबी होऊ शकतील. अशा प्रकारच्या पोस्ट ऑफिसच्या या 5 योजना आहेत.