अहमदनगर

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; या ठिकाणचा धक्कादायक प्रकार

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये आजही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे.

लोणी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूरच्या रेल्वे कॉलनीत राहणारा मोहन उर्फ सनी प्रसन्ना लोंढे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे अमिष दाखवून तसेच पळून जाऊ नये म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. ही घटना लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. लोणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button