अहमदनगर

लग्नातील मानपान आणि दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ केला आणि…

लग्नातील मानपान, हुंडा आणि व्यवसायासाठी आई-वडीलाकडून दोन लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पीडित विवाहितेने येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विवाहितेचा पती मोहसीन सुलेमान शेख, दीर नासीर सुलेमान शेख,

जाव अंजुम नासीर शेख (सर्व रा. घोडेगाव ता. नेवासा), नंनद रिजवान अख्तर शेख, तिचा पती अख्तर हानिफ शेख (दोघे रा. मोमीनगल्ली, भिंगार), नंनद रेश्मा आझाद खान, तिचा पती आझाद शेर खान (दोघे रा. देवगाव ता. नगर) यांचा समावेश आहे.

फिर्यादी यांचा विवाह 9 मे, 2010 रोजी घोडेगाव येथील मोहसीन शेख यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर फिर्यादी यांना दोन ते तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविले.

त्यानंतर लग्नातील मानपान, हुंडा दिला नाही या कारणातून छळ सुरू केला. व्यवसायासाठी आई-वडीलाकडून दोन लाख रूपये आणण्यासाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button