अहमदनगर

दुर्दैवी घटना: रूग्णालयात मुलीला भेटण्यासाठी जात असताना बापाचा अपघाती मृत्यू

अहमदनगर- ट्रकने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत सचिन काशिनाथ रोहोम (वय 30 रा.खिर्डी गणेश ता. कोपरगाव) हा तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज (सोमवार) दुपारी घडली. कोपरगाव शहराजवळील साई धाम कमानींजवळ नगर-मनमाड रस्त्यावर हा अपघात झाला.

सचिन हे मुलगी माहेश्वरी हिला भेटण्यासाठी शिर्डी येथील रूग्णालयात जात असताना भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने धडक दिली. त्यात सचिन जागीच ठार झाले.

कंटेनर चालक कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पसार झाला. महेश हरिभाऊ रोहोम (वय-25) रा.खिर्डी गणेश यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button