Triumph Motorcycles Vs Royal Enfield : Speed 400 की Classic 350? कोणती बाइक आहे सर्वोत्तम? जाणून घ्या किंमत, फीचर्स..
Triumph Motorcycles ने अलीकडेच भारतात सर्व-नवीन Speed 400 Neo-Retro Roadster लाँच केले आहे, ज्याची किंमत 2.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Speed 400 Vs Classic 350 : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाइक लॉन्च होत आहेत. देशातील तरुणांमध्ये बाईकच्या बाबतील खूप क्रेझ आहे. अनेकजण अतिशय महागड्या बाइक खरेदी करत असतात.
दरम्यान, Triumph Motorcycles ने अलीकडेच भारतात सर्व-नवीन Speed 400 Neo-Retro Roadster लाँच केले आहे, ज्याची किंमत 2.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याला संभाव्य खरेदीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र ही बाइक रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च्या तुलनेत किती शक्तीशाली आहे? जाऊन घ्या याबद्दल…
स्पेसिफिकेशन्स
ट्रायम्फ स्पीड 400 मध्ये 398.15cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे, जे 39.5 bhp आणि 37.5 Nm निर्मिती करते. जे 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
दुसरीकडे, Royal Enfield Classic 350 मध्ये 349.34cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे जे 19.9 bhp आणि 27 Nm जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते.
स्पीड 400 ची लांबी – 2091 मिमी, रुंदी – 814 मिमी, उंची – 1084 मिमी, व्हीलबेस – 1377 मिमी, सीटची उंची – 790 मिमी, वजन – 176 किलो आणि इंधन टाकीची क्षमता – 13 लिटर आहे. तर, क्लासिक 350 ची लांबी – 2145 मिमी, रुंदी – 785 मिमी, उंची – 1090 मिमी, व्हीलबेस – 1390 मिमी, सीटची उंची – 805 मिमी, वजन – 195 किलो आणि इंधन टाकीची क्षमता – 13 लिटर आहे.
वैशिष्ट्ये
Speed 400 ला 43mm USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक शोषक आहे. RE च्या क्लासिक 350 मध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉकर्स मिळतात.
दोन्ही मोटरसायकलवरील ब्रेकिंग ड्युटी ड्युअल चॅनल ABS सोबत दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकसह येतात. Speed 400 ला स्लिप आणि असिस्ट क्लच, ट्रॅक्शन कंट्रोल आणि LED लाइटिंग यांसारखी अनेक वैशिष्ट्ये मिळतात, जी त्याला क्लासिक 350 च्या पुढे नेतात.
किंमतीची तुलना
नवीन ट्रायम्फ स्पीड 400 ची किंमत 2.33 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे. तथापि, पहिल्या 10,000 खरेदीदारांसाठी, कंपनी 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. दुसरीकडे, Royal Enfield Classic 350 ची एक्स-शोरूम किंमत रु. 1.93 लाख ते रु. 2.25 लाख आहे.