अहमदनगर

महिलेला शिवीगाळ करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न; मुलाला केली मारहाण

एका युवकाला काठीने मारहाण करून जखमी केले तर त्याच्या आईला शिवीगाळ करून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. लग्नात शिवीगाळ केल्याच्या कारणातून दोघांनी हा प्रकार केला.

नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदीप मळू गायकवाड व प्रशांत महादेव गायकवाड (दोघे रा. आगडगाव ता. नगर) यांच्याविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घरी असताना संदीप व प्रशांत तेथे आले व फिर्यादीला म्हणाले,‘तुमचा मुलगा कुठे गेला, त्याने आम्हाला बोरूडे यांच्या मुलीच्या लग्नात शिवीगाळ केले होते’, तेव्हा फिर्यादी त्यांना समजून सांगत असताना दोघांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत हात धरून झटापत केली.

फिर्यादी यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. त्याचा मुलगा तेथे आला असता त्याला काठीने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button