आर्थिक

TVS X Electric Scooter : तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार TVS ची इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त 7,000 दरमहिन्याला भरून आणा घरी; जाणून घ्या प्लॅन

तुम्ही TVS ची इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्तात घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 7,000 दरमहिन्याला भरावे लागणार आहेत.

TVS X Electric Scooter : जर तुम्ही एक शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. कारण तुम्ही आता फक्त 7,000 दरमहिन्याला भरून TVS ची शक्तिशाली स्कूटर घरी घेऊन येऊ शकता.

ही स्कूटर 105 kmph चा टॉप स्पीड देते

ही TVS X इलेक्ट्रिक स्कूटर सध्या फक्त 1 प्रकार आणि 1 रंग पर्यायात उपलब्ध आहे. ही स्कूटर 105 kmph चा टॉप स्पीड देते. ही स्कूटर 3 तास 40 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. या स्कूटरमध्ये 4.44 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे.

4 सेकंदात 60 किमी प्रतितास वेग

जर या स्कूटरच्या स्पीडबद्दल माहित करून घ्यायचे असेल तर ही स्कूटर फक्त 4.5 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग वाढवते. TVS X इलेक्ट्रिक स्कूटर 2,49,990 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध आहे. मात्र तुम्ही हे पैसे दरमहिन्याला भरू शकता.

25000 रुपये डाउन पेमेंट

जर तुम्हाला ही स्कूटर तुमच्या घरी आणायची असेल तर 25,000 रुपये डाऊन पेमेंट भरून स्कूटर खरेदी करता येईल. यामध्ये तुम्हाला 6 टक्के व्याज दरासह 3 वर्षांसाठी 6,845 रुपये प्रति महिना हप्ता भरावा लागेल. तसेच याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी लागेल.

TVS X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट कन्सोल

TVS X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक स्मार्ट कन्सोल आहे, ज्यामध्ये आपण लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग करू शकतो. TVS यात क्रूझ कंट्रोल आणि ओव्हरस्पीडिंग अलर्ट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

TVS X इलेक्ट्रिक स्कूटरचा 4.44 kWh बॅटरी पॅक आहे

या स्कूटरमध्ये फास्ट चार्जर आणि नॉर्मल चार्जर अशा दोन्हीमधून चार्जिंगचा पर्याय आहे. यामध्ये जिओफेन्सिंगसह नेव्हिगेशन देण्यात आले आहे. TVS X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.44 kWh बॅटरी पॅक आहे.

TVS X इलेक्ट्रिक स्कूटर अॅल्युमिनियम ट्विन-स्पार फ्रेम

TVS X इलेक्ट्रिक स्कूटर अॅल्युमिनियम ट्विन-स्पार फ्रेमवर बनवली आहे. यात 12-इंच अलॉय व्हीलचा पर्याय आहे. आरामदायी राइडसाठी यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला ऑफसेट मोनोशॉक आहेत. यात सिंगल-चॅनल एबीएससह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. अशा प्रकारे तुमच्यासाठी ही एक मस्त बाइक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button